सावंतवाडी / प्रतिनिधी
Sonography machine will be in service in Sawantwadi Upazila Hospital!
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये सोनोग्राफी मशीन सेवेत येणार आहे . गरोदर महिलांसाठी मोफत सेवा मिळणार आहे . सामाजिक बांधिलकी व जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये आता गरोदर स्त्रियांची प्रसूती विषयाशी आवश्यक चाचण्यांकरिता गरोदर महिलांना सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी व रिपोर्ट ही सेवा मोफत मिळणार आहे . अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक यांनी रवी जाधव यांना दिली. पहिल्या टप्प्यात ही अत्यावश्यक सेवा सुरू करण्यात आलेली आहे. याचा फायदा सर्वसामान्य रुग्णांना होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये सोनोग्राफी संबंधित चाचण्या मुतखडा, प्रोस्टेल, हर्निया,पोटाचे विकार अशाही प्रकारच्या रुग्णांना ही सुद्धा सेवा लवकरात लवकर उपलब्ध होण्यासाठी रवी जाधव यांनी जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुबोध इंगळे यांच्याशी संपर्क साधला असता , यासंबंधी टेक्निशियन व रीडोलॉजिस तज्ञ डॉक्टर यांची नेमणूक नजीकच्या काळामध्ये लवकरात लवकर केली जाईल व सर्वप्रथम सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये रेडिओलॉजी तज्ञ डॉक्टर पाठवण्याची व्यवस्था आम्ही लवकरात लवकर करू असे सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांना सांगितले. जिल्हा रुग्णालयाचे सिविल सर्जन डॉक्टर नागरगोजे व वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुबोध इंगळे यांचे विशेष आभार सामाजिक बांधिलकी व जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी मानले.









