वृत्तसंस्था/ अहमदाबाद
सर्वोच्च न्यायालयाने गुजरात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून सोनिया गोकानी यांचे नाव निश्चित केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमच्या शिफारसीत गोकानी यांचे नाव सामील आहे. गोकानी या गुजरात उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश ठरणार आहे. मूळच्या जामनगरच्या असणाऱया गोकानी या 15 दिवसांपर्यंत या पदावर असणार आहेत. गोकानी मुख्य न्यायाधीश म्हणून 24 फेब्रुवारीपर्यंतच काम पाहतील. वयोमर्यादेमुळे त्या 25 फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. मागील वर्षी स्वामीनारायण संप्रदायाशी निगडित हरिधाम सोखडाच्या संवेदनशील प्रकरणाची सुनावणी गोकानी यांच्यासमोरच झाली होती. गोकानी या 2011 मध्ये उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश झाल्या होत्या. 2003-08 दरम्यान दहशतवादाशी निगडित अनेक खटल्यांमध्ये त्यांनी कठोर निर्णय दिले होते.









