जयराम रमेश यांनी दिली माहिती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
काँग्रेस पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या मातोश्रीचे इटलीत निधन झाले आहे. काँग्रेसचे प्रभारी महासचिव जयराम रमेश यांनी ट्विट करत यासंबंधी माहिती दिली आहे. सोनिया गांधी यांच्या मातोश्री पाओला माइनो यांचे शनिवारी 27 ऑगस्ट रोजी इटलीत त्यांच्या निवासस्थानी निधन झाले.
पाओला माइने यांच्यावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. सोनिया गांधी या 23 ऑगस्ट रोजी स्वतःच्या आजारी आईला भेटण्यासाठी रवाना झाल्या होत्या असे समजते. सोनिया गांधी वैद्यकीय तपासणीसाठी सध्या विदेशात आहेत. राहुल गांधी अन् प्रियांका वड्रा देखील त्यांच्यासोबत आहेत.









