Sonia Gandhi: केंद्राचा बजेट सादर झाल्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेचे झोड उठवले. दरम्यान, कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देखील हल्लाबोल केला आहे. आपल्या मित्रांना लाभ मिळावा यासाठी पंतप्रधानांच्या धोरणांनी देशात सातत्यानं संकट ओढवून घेतलं आहे. हे बजेट म्हणजे गरिबांवर मोदी सरकारनं केलेला ‘सायलेंट स्ट्राईक’ आहे. असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.
सोनिया गांधी म्हणाल्या की, गरीब आणि कमजोर लोकांसाठी बजेटमधील तरतूद आणखी कमी करुन त्यांची स्थिती आणखीनच खराब केली आहे. मोदी सरकारचा गरीबांवर हा सायलेंट स्ट्राईक झाला आहे. २००४-१४ दरम्यान, युपीए सरकारद्वारे बनवण्यात आलेले सर्व दूरगामी अधिकार हे कायद्याच्या केंद्रस्थानी होते. सर्व शिक्षा अभियानासाठीचा निधी सलग तिसऱ्या वर्षी कमी झाला आहे. यामुळं आपल्या शाळांमध्ये स्त्रोतांची कमतरता भासेल. कोरोनापूर्वी जीडीपीला फटका बसला होता. याची पूर्ण रिकव्हरी होईल असं आर्थिक सर्वेक्षणात सांगण्यात आलं होतं.
पण केवळ श्रीमंत भारतीयांना याचा फायदा मिळत आहे. तसेच मनरेगाचा निधी कमी करण्यात आला आहे.सन २०१८-१९ मध्ये हा निधी सर्वात खालच्या पातळीवर आणला गेला. त्यामुळं ग्रामीण भागातील मजुरांना कमी काम मिळेल या योजनेत मजुरी जाणून बुझून बाजारातील दरांपेक्षा कमी ठेवली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









