Soniya Gandhi : छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये काँग्रेसच्या तीन दिवसीय 85 व्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सोनिया गांधींनी आपल्या भाषणादरम्यान आपल्या निवृत्तीबद्दल महत्वपुर्ण विधान केले आहे. मी कधीच निवृत्त झालो नाही आणि कधीही निवृत्त होणार नाही.
सोनिया गांधींच्या निवृत्तीच्या बातम्या माध्यमामध्ये पसरल्यानंतर पक्षाच्या प्रवक्त्या अलका लांबा यांनी श्रीमती गांधींचा हवाला देत म्हणाल्या की, त्या कधीच निवृत्त झाल्या नाहीत आणि कधी होणारही नाहीत.
कॉंग्रेस पक्षाच्या रायपूर अधिवेशनाच्या समारोपाच्या दिवशी बोलताना प्रवक्त्या अलका लांबा म्हणाल्या, “माध्यमांनी सनिया गांधी मॅडमच्या भाषणाचा चुकीचा अर्थ लावणे थांबवावे. स्वता सोनिया गांधींनी सांगितले की, त्या कधीही निवृत्त झाल्या नाहीत आणि कधी होणार नाही.” लांबा यांनी प्रसारमाध्यमांनी वेगळा अर्थ काढू नये, असे आवाहन केले.
“डॉ. मनमोहन सिंग यांच्या सक्षम नेतृत्वाखाली 2004 आणि 2009 मध्ये मिळालेल्या कॉंग्रेसच्या विजयांनी मला वैयक्तिक समाधान दिले. पण आनंदाची गोष्ट म्हणजे माझे राजकिय सत्र भारत जोडो यात्रेने संपुष्टात आली गेली. भारत जोडो यांत्रा काँग्रेससाठी एक टर्निंग पॉइंट ठरला असून हे आता सिद्ध झाले आहे की भारतीय जनतेला एकोपा, सहिष्णुता आणि समानता हवी आहे, अशा कॉंग्रेस अध्यक्षा म्हणाल्याचे अलका लांबा यांनी सांगितले.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









