सनी देओल-वरुण धवन मुख्य भूमिकेत
जे.पी. दत्ता यांच्या दिग्दर्शनाखाली तयार 1997 मध्ये प्रदर्शित चित्रपट बॉर्डर या चित्रपटाचा आता सीक्वेल येणार आहे. सनी देओलने बॉर्डर 2 या चित्रपटाचे अधिकृत पोस्टर यापूर्वीच शेअर केले आहे. परंतु या नव्या चित्रपटात दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांची एंट्री झाली आहे. आता पहिल्या अभिनेत्रीचे नावही निश्चित झाले आहे.
सनी देओल-वरुण धवन यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात पंजाबी अभिनेत्री सोनम बाजवाची एंट्री झाली आहे. या चित्रपटाच्या चित्रिकरणात ती चालू महिन्याच्या अखेरीस सामील होणार आहे. ती या चित्रपटात एका पंजाबी युवतीची भूमिका साकारणार आहे.
बॉर्डर 2 चित्रपटात तिची जोडी दिलजीत दोसांझसोबत जमणार आहे. यापूर्वी या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. बॉर्डर 2 या चित्रपटात अनेक नवे कलाकार असले तरीही यात जुने गाणे ‘संदेसे आते हैं’ समाविष्ट असणार आहे. या गाण्याला सोनू निगम आणि अरिजीत सिंह यांचा आवाज यावेळी लाभणार आहे.









