प्रभास, सैफ अन् क्रीति सेनॉनचा चित्रपट
प्रभास, क्रीति सेनॉन आणि सैफ अली खान यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘आदिपुरुष’ पुढील वर्षी 12 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. ओम राउत यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱया या चित्रपटाचे बजेट खुपच मोठले आहे. या चित्रपटात आता जन्नत फेम सोनल चौहानची एंट्री झाल्याचे समजते. सोनल या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

हा चित्रपट रामायणावर आधारित असून यात प्रभास भगवान रामाची भूमिका साकारतोय. सैफ अली खन रावणाच्या अवतारात दिसून येईल. क्रीति ही सीतामातेची भूमिका साकारत आहे. याचबरोबर सन्नी सिंह आणि वत्सल सेठ देखील या चित्रपटात काम करत आहेत.
आदिपुरुषमध्ये एका व्यक्तिरेखेच्या स्वरुपात सामील झाल्याची माहिती सोनलचे दिली आहे. आदिपुरुषचा हिस्सा ठरल्याने मी अत्यंत उत्साही आहे. ही आतापर्यंतची माझी सर्वात वेगळी भूमिका ठरणार असल्याचे सोनलने म्हटले आहे. या चित्रपटाचे बजेट 350 ते 400 कोटी रुपयांदरम्यान असल्याचे समजते. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळी भाषेत प्रदर्शित होणार आहे.









