अक्षय कुमार अन् टायगर श्रॉफची जोडी
सोनाक्षी सिन्हा आता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा चित्रपट ‘बडे मियां छोटे मियां’मध्ये दिसून येणार आहे. दिग्दर्शन अली अब्बास जफर यांचा हा चित्रपट यंदाचा सर्वात मोठा अॅक्शन एंटरटेनर चित्रपट ठरणार असल्याचे मानले जात आहे. अशा स्थितीत सोनाक्षी या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्याने आनंदी आहे.

सोनाक्षी चालू वर्षात ‘हीरामंडी’ ‘दहाड’ या चित्रपटांमध्येही दिसून येणार आहे. दहाड या चित्रपटाद्वारे ती ओटीटीवर पदार्पण करणार आहे. अली अब्बास जफरच्या बहुप्रतीक्षित चित्रपटात सोनाक्षी ही मुख्य नायिकेच्या भूमिकेत असणार आहे. या चित्रपटाच्या टीमने मुंबई चित्रिकरणाचा पहिला हिस्सा पूर्ण केला आहे. तर दुसरा हिस्सा चालू महिन्याच्या अखेरपर्यंत स्कॉटलंड आणि अबुधाबीमध्ये चित्रित केला जाणार आहे.
बडे मियां छोटे मियां या चित्रपटात सहभागी होता आल्याने उत्साही आहे. अक्षयसोबत काम करण्याचा अनुभव नेहमीच चांगला असतो. तर टायगरसोबत माझा हा पहिलाच चित्रपट आहे. अली अब्बास जफर हा उत्तम दिग्दर्शक असून त्याचा हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरणार असल्याची अपेक्षा असल्याचे सोनाक्षीने म्हटले ओ.









