12 मे रोजी प्राइम व्हिडिओवर झळकणार सीरिज
अन्य कलाकारांप्रमाणे सोनाक्षी सिन्हा देखील आता ओटीटी जगतात पदार्पण करत आहे. लवकरच ती ‘दहाड’ या वेबसीरिजमध्ये दिसून येणार आहे. या सीरिजचा फर्स्ट लुक पोस्टर आणि प्रदर्शनाची तारीख घोषित करण्यात आली आहे. ‘दहाड’मध्ये अभिनेता विजय वर्मा दिसून येणार आहे.

‘दहाड’ ही अमेझॉन ओरिजिनल सीरिजची क्राइम ड्रामा वेबसीरिज आहे. एक्सेल मीडिया अँड एंटरटेन्मेंट आणि टायगर बेबीकडून याची निर्मिती करण्यात आली आहे. तर रीमा कागती आणि रुचिका ओबेरॉय यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. या वेबसीरिजमध्ये सोनाक्षी अन् विजय वर्मासोबत गुलशन देवैया तसेच सोहम शाह हे कलाकार दिसून येणार आहे. ‘दहाड’मध्ये सोनाक्षी एका पोलीस अधिकाऱयाच्या भूमिकेत आहे. सीरियल किलरचा शोध घेण्याची जबाबदारी या महिला अधिकाऱयाकडे सोपविलेली असते. या सीरिजमध्ये 8 एपिसोड्स असून यात सोनाक्षीने अंजली भाटी नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. ‘दहाड’चा बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रीमियर करण्यात आला होता. ही सीरिज प्राइम व्हिडिओवर 12 मे रोजी स्ट्रीम करण्यात येणार आहे.









