केरळमधील घटना : महिला आमदाराने नाकारला आरोप
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
केरळमध्ये आमदाराच्या पुत्रासमवेत 9 जणांना गांजा बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. परंतु आता माकपच्या आमदार यू. प्रतिभा यांनी स्वत:च्या मुलाला गांजासोबत अटक करण्यात आल्याचे वृत्त फेटाळले आहे. तर त्यांच्या पुत्रानेही सोशल मीडियावर व्यक्त होत स्वत:वरील आरोप नाकारले आहेत.
कायमकुलम येथील आमदार यू. प्रतिभा यांनी स्वत:च्या पुत्राची केवळ चौकशी करण्यात आल्याचा दावा केला. माझा पुत्र त्याच्या मित्रांसोबत बसलेला असताना हा प्रकार घडला आहे. प्रसारमाध्यमांनी वृत्त प्रकाशित केल्यावर अनेक फोन कॉल्स येत असल्याचे प्रतिभा यांनी म्हटले आहे.
माझा पुत्र आणि त्याचे मित्र एकेठिकाणी बसले असताना सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी तेथे जात काही प्रश्न विचारले. तर दुसरीकडे प्रसारमाध्यमांनी माझ्या पुत्राला गांजासोबत पकडण्यात आल्याचे वृत्त प्रकाशित करण्यात आले आहे. हे त्त जर सत्य असेल तर मी माफी मागेन, अन्यथा प्रसारमाध्यमांनी जाहीरपणे माफी मागावी असे आव्हान प्रतिभा यांनी दिले.
तर दुसरीकडे सीमाशुल्क विभागाने अलाप्पुझा जिल्ह्यातील कुट्टनाडच्या थकाझी येथे माकप आमदार यू. प्रतिभा यांच्या पुत्रासमवेत 9 जणांना अटक करण्यात आल्याचे स्पष्ट केले. या 9 आरोपींची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. थकाजी पूलाखाली असलेल्या आरोपींकडून गांजा जप्त पेले. या 9 जणांना गांजा बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली असून याप्रकरणी गुन्हा नोंदवूनतपास केला जात असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.









