जत ,प्रतिनिधी
जत तालुक्यातील दरीबडची येथील डाळिंब बागायतदार आप्पासाहेब आण्णाप्पा मल्लाड (वय ४८) यांचा डोक्यात धारदार शस्त्राने हल्ला करून करून निर्घृण खून करण्यात आला. दरीबडची संख येथील गेजगे वस्तीजवळ कुलाळ यांच्या शेत तलावा जवळील मल्लाड वस्तीकडे जाणाऱ्या वळणावर शुक्रवार दि. १३ रोजी रात्री ८ वाजता ही घटना घडली. मयत मल्लाड यांचा खून जावई यानेच केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी जत पोलिसांनी जावई व त्याचा भाऊ यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, एका संशयित आरोपीस ताब्यात घेतले आहे.
अधिक माहिती अशी की, डाळिंब बागायतदार असलेले आप्पासाहेब मल्लाड हे दरीबडची येथे वस्तीवर कुटुंबासह राहतात.त्यांना तीन मुली व मुलगा आहे.त्यांच्या एका मुलीचा विवाह अथणी तालुक्यातील ऐगळी येथील तरुणाशी झाला होता.मात्र पती-पत्नीचे पटत नसल्याने मुलगी सध्या दरीबडची येथे माहेरी राहत आहे.पती-पत्नीचा न्यायालयामध्ये दावा सुरू आहे.त्यामुळे जावयासोबत त्यांचा वाद सुरू होता.तसेच जावयाने अनेकदा त्यांना फोनवरून धमकावले होते,अशी माहिती नातेवाईकांनी दिली.
शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आप्पासाहेब गावात येऊन दुचाकीवरून मळ्याकडे निघाले होते.कुलाळ यांच्या शेत तलावाजवळून त्यांच्या घराकडे जाणारा रस्ता निर्जन आहे.जवळच वनविभागाचे क्षेत्र असल्याने कुणी फारसे या भागात फिरकत नाही.याच ठिकाणी दुचाकी अडवून आप्पासाहेब यांच्यावर हल्ला करण्यात आला.डोक्यात अवजड वस्तूने हल्ला तसेच धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहे.
दरम्यान,ही घटना झाल्याचे समजताच घटनास्थळी पोलिस निरीक्षक राजेश रामघरे यांच्यासह पथकाने भेट देऊन पाहणी करुन घटनेचा पंचनामा केला.शुक्रवारी रात्रीपासून पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी सुरू केली होती.यात मललाड यांचा खून जावई व त्याचा भाऊ यांनीच केल्याचे समोर आले आहे.पोलिसांनी संशयित आरोपी तथा जावई सचिन रुद्राप्पा बल्लोळी व मिलन रुद्राप्पा बल्लोळी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.तसेच यापैकी एक जणाला ताब्यातही घेतले आहे.तपास जत पोलीस करीत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








