रत्नागिरी :
रत्नागिरीतील जनतेसाठी मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंग पवित्र दर्शनाचा सुवर्णयोग एक ऐतिहासिक आणि अध्यात्मिक क्षण साजरा करत, आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनतर्फे सोमनाथ ज्योतिर्लिंग यात्रेची घोषणा करण्यात आली आहे. १८ जून रुद्र पूजा आणि दर्शन सोहळा अंबर हॉल, टीआरपी येथे तर १९ जून मराठा मंडळ हॉ ल. जिल्हा परिषद जवळ, माळनाका येथे पार पडणार आहे. दोन्ही दिवशी हा कार्यक्रम सायंकाळी ६ ते ८.३० दरम्यान पार पडणार आहे. या यात्रेद्वारे मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे अवशेष जनतेसाठी दर्शनाला आणले जाणार आहेत. १०२६ मध्ये महंमद गझनीने नुकसान केलेल्या मूळ शिवलिंगाचे अवशेष अग्निहोत्री ब्राह्मण कुळाने दक्षिण भारतात सुरक्षित ठेवले होते. त्यांनी हे कांची शंकराचार्यांकडे नेले आणि जनतेसमोर आणण्याची परवानगी मागितली. शंकराचार्यांनी आशीर्वाद देत हे अवशेष बेंगळुरूमधील गुरुदेव श्री श्री रवीशंकर यांच्याकडे घेऊन जाण्यास सांगितले. आता गुरुदेवांच्या मार्गदर्शनाखाली, हे पवित्र अवशेष सर्वांसाठी उपलब्ध करण्यात येत आहेत.
१५ जून ते ६ जुलै दरम्यान ही दर्शन यात्रा महाराष्ट्रभर चालणार आहे. लाखो भक्तांना या पवित्र अवशेषांचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. पूजा, सत्संग, ध्यान आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे आध्यात्मिक कार्यक्रम यादरम्यान पार पडणार आहेत. ही यात्रा केवळ एक धार्मिक कार्यक्रम नसून भारताच्या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक पुर्नजागरणाचा भाग आहे. ‘ही केवळ काही शिलाखंडांची यात्रा नसून श्रद्धेची, पुनरुत्थानाची आणि भारताच्या आत्म्याशी नातं जोडणारी यात्रा आहे, असे आर्ट ऑफ लिव्हिंगचे वरिष्ठ प्रशिक्षक दर्शक हाथी यांनी सांगितले








