“इंद्रजीत सावंत” धमकी प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रीया
कोल्हापूर
“हे निव्वळ राजकारण आहे. इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनाही याची कल्पना आहे, की पोलिसांनी त्वरीत या संदर्भात गुन्हा नोंद केला. न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर पोलिसांनी उच्च न्यायलयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये पोलिसांनी कोरटकर यांच्या कस्टडी अपेक्षित आहे. अशी मागणी देखील केली आहे. परंतु काही लोकांना त्यावर राजकारण करायचे आहे, तर त्यांना ते करु दे.” अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी कोल्हापूर विमानतळावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.








