Remedies for oily skin: बदलत्या वातावरणामुळे चेहरा तेलकट होतो. बऱ्याच जणांची त्वचा देखील जन्मापासूनच तेलकट असते. तेलकट चेहऱ्यावर धूळ, माती चिकटल्याने त्वचेवर त्याचा परिणाम होतो. आणि मग चेहऱ्यावर मुरूमही येतात. यासाठी जाणून घेऊ चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी करण्याचे काही उपाय. याचा कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही. शिवाय तुमच्या चेहऱ्यावरील ग्लोही वाढेल. चंदन आणि हळद चंदन आणि हळद आणि हळदीची पेस्ट लावल्यानंतर तेलकट त्वचा नाहिशी होऊन तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येईल . चंदन आणि हळद समप्रमाण घ्यावं. त्यामध्ये लिंबाचा रस किंवा पाणी टाकून पेस्ट तयार करा. ही पेस्ट १० मिनिटांपर्यंत चेहऱ्यावर लावून ठेवा. दहा मिनिटांनंतर स्वच्छ पाण्यानं चेहरा धुवा. कोरफड तेलकट त्वाचेपासून सुटका करण्यासाठी कोरफड फायद्याची आहे. कोरफडीमध्ये एण्टी-इफ्लेमेट्री गुण आहेत. या गुणामुळे त्वाचला होणारं इन्फेक्शन थांबते. कोरपडीचं जेल दररोज चेहऱ्यार लावल्यानंतर तेलकटपणा दूर होऊ शकतो. ज्यासाठी १ टीस्पून हळद आणि कोरफडीचा गर आणि काकडीचा रस हे सर्व पदार्थ एकत्र करुन ही पेस्ट पंधरा ते वीस मिनिटं चेहऱ्यावर लावून ठेवावी आणि त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवावा. मुलतानी माती आयुर्वेदातील घटक असलेली मुलतानी माती चेहरा उजळण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते. तसेच चेहऱ्याचा कोरडेपणा दूर करण्यासाठीही या मातीचा लेप फायदेशीर ठरतो. तेलकट चेहऱ्यावर मुलतानी माती लावल्यात तुमचा चेहरा तजेलदार होईल. मुलतानी मातीत पाणी टाकून चांगले मिश्रण करा. ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर लावा. तुमचा चेहरा आधिक तचेलदार होईल. शिवाय त्वचेवरील तेलकटपणाही दूर झालेला असेल. दूध त्वचेसाठी दूधाचा वापर कमीच केला जातो. पण तेलकट त्वचेपासून सुटका हवी असल्यास दुधाचा लेप चेहऱ्यावर लावा. लिंबू आणि दूध याचं व्यवस्थित मिश्रण करा. कॉटनच्या कपड्यानं चेहऱ्यावर लावा. दिवसातून दोन वेळा हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. तुमची त्वचा तचेलदार आणि सॉफ्ट होईल.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









