Somalia Attack : सोमालियाची राजधानी मोदादिशूमधील हॉटेल हयातवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. यामध्ये 11 जणांचा मृत्यू झालाय. हे सर्व दहशतवादी अल शबाब या संघटनेचे असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्यासारखा दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. आधी त्यांनी हॉटेलबाहेर स्फोट केला. त्यानंतर दहशतवादी गोळीबार करत हॉटेलमध्ये शिरले.
दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 9 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही घटना मोहादिशूमधील (Mogadishu) आहे. जिथे बंदुकधारींनी हयात हॉटेलवर गोळीबार केला आणि दोन कारचा स्फोट केला. त्याचवेळी अल-कायद्याशी (Al-Qaeda) संलग्न असलेल्या अल-शबाब गटानं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सुरक्षा दल आणि जिहादी गटामध्ये झालेल्या चकमकीत मोहादिशूचे गुप्तचर प्रमुख मुहिद्दीन मोहम्मद यांच्यासह दोन सुरक्षा अधिकारी जखमी झाले आहेत
वृत्तसंस्था एएफपीशी या घटनेबाबत बोलताना सुरक्षा अधिकाऱ्यानं सांगितलं की, दहशतवादी अजूनही हॉटेल हयातमध्ये आहेत आणि सुरक्षा दलांशी चकमक सुरू आहे. ते म्हणाले की, हॉटेल हयातवरील हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले, त्यानंतर जिहादी गटाचे सैनिक आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. हे बंदूकधारी हयात हॉटेलमध्ये घुसण्याच्या एक मिनिट आधी मोठा स्फोट झाला. पहिल्या स्फोटानंतर काही मिनिटांनी दुसरा स्फोट झाला. या स्फोटांमुळे सुरक्षा दलाचे काही सदस्य आणि नागरिक जखमी झाले.
Previous Articleकोयना धरणाची दारे साडे चार फूट उचलली
Next Article आथणी येथे गंभीर अपघात २ ठार ३९ जखमी









