स्वामी नगरातील नागरिकांच्यावतीने नगरपंचायतीला दिले निवेदन
वार्ताहर /किणये
मच्छे औद्योगिक वसाहत व संभाजी नगरातील सांडपाणी मच्छे येथील स्वामीनगर येथे साचले आहे. याचा स्वामी नगरातील नागरिकांना त्रास होम आहे .या सांडपाणी समस्येवर तोडगा काढावा. अशी मागणी स्वामी नगरातील नागरिकांच्यावतीने मच्छे नगरपंचायतीकडे करण्यात आली आहे. मंगळवारी या संदर्भात नोडल अधिकारी एन. आय. नागनुरी यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे. मच्छे औद्योगिक वसाहत व संभाजी नगरात येणाऱ्या सांडपाण्याचा निचरा होत नाही. सांडपाणी स्वामी नगरात साचल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे यामुळे यावर मच्छे नगरपंचायतीने उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. निवेदन देण्यासाठी कामिनी पाटील, के.बी. मुन्नावळी, सिया खणगावी, प्रियंका देसाई, सुवर्णा लोहार, कांचन सुतार, रेखा पाटील, टी. के लोहार आदींसह स्वामीनगरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.









