रहिवाशांचे महापालिकेला मागणीचे निवेदन
बेळगाव : कंग्राळी खुर्द जवळील रामनगर येथील गटारींचे काम महानगरपालिकेने अर्धवट केले आहे. यामुळे पावसाळ्यामध्ये पाण्याचा निचरा होणे अवघड झाले आहे. सहा महिन्यांपूर्वी निवेदन देण्यात आले. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. पावसाळ्यापूर्वी गटारीचे काम पूर्ण करावे, या मागणीसाठी रामनगर येथील नागरिक व महिलांनी महानगपालिकेला निवेदन दिले आहे. पावसाळ्यात अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरत आहे. गटारी नसल्यामुळे पाणी साचून राहत आहे. परिणामी डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. याचबरोबर आरोग्याच्या तक्रारीही उद्भवत असून तातडीने गटारीचे पाणी निचरा होण्यासाठी येथील सर्व गटारींचे बांधकाम पूर्ण करावेत, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
पिण्याच्या पाण्याचीही समस्या सोडवा
रामनगर येथील वॉर्ड क्रमांक 33 मधील दुसरा क्रॉस परिसरात ही समस्या निर्माण झाली आहे. याचबरोबर पिण्याच्या पाण्याचीही समस्या भेडसावत असून 24 तास पाणी पुरवठा योजना राबवावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी प्रकाश पाटील, गणपत कुंभार, के. एस. ताडे, आदित्य संकन्नावर, पूजा संभाजीचे, लता पाटील, ग्रा. पं. सदस्य विनायक कम्मार यांच्यासह महिला उपस्थित होत्या.









