2 महिन्यांनी होणार होता निवृत्त
पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचा एक सैनिक हुतात्मा झाला आहे. जम्मू-काश्मीरच्या पुंछ येथे तैनात सुभेदार मेजर पवन कुमार यांना हौतात्म्य प्राप्त झाले आहे. पवन कुमार हे हिमाचल प्रदेशच्या सिहोलपुरीचे रहिवासी होते. पवन कुमार यांना पुंछच्या कृष्णाघाटीमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारादरम्यान गोळी लागली होती. या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले होते, त्यांना त्वरित रुग्णालयात हलविले, जेथे उपचारादरम्यान त्यांना वीरगति प्राप्त झाली. 49 वर्षीय पवन कुमार यांच्या पश्चात कुटुंबामध्ये आईवडिल, पत्नी, मुलगा-मुलगी आहे. पवन कुमार यांचे पिता गर्ज सिंह हे पंजाब रेजिमेंटमधून सेवानिवृत्त झाले हेते.
ऑगस्टमध्ये होणार होते निवृत्त
पवन कुमार हे अलिकडेच 1 महिन्याच्या सुटीनंतर सेवेत परतले होते. 31 ऑगस्टला ते सेवानिवृत्त होणार होते. पवन कुमार यांच्या पार्थिवावर रविवारी पूर्ण सैन्य व राजकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.









