अणुबॉम्बपेक्षा मोठ्या धोक्याचा वैज्ञानिकांचा इशारा
सूर्यामधून अविश्वसनीय स्वरुपात मोठी ऊर्जा तरुंग उत्सर्जित होतात, ज्यांना सौर सुपरफ्लेयर म्हटले जाते. वैज्ञानिक आता या सुपरफ्लेयरवरून चिंतेत पडले आहेत. या घटना सुमारे एक हजार वर्षांमध्ये एकदाच घडतात असे पूर्वी मानले जात होते, परंतु सुपरफ्लेयर्सना अनेकदा सामोरे जावे लागणार असल्याचे अलिकडेच समोर आले आहे. आमचे उपग्रह, जीपीएस आणि पॉवरग्रिड यासारख्या अनेक तंत्रज्ञानांना एक मोठी सौर ज्वाला नष्ट करू शकते.
सौर ज्वाळा ऊर्जा विस्फोट असून ज्यांना सूर्य अंतराळात उत्सर्जित करत असतो. सामान्य सौर ज्वाळा सहजपणे अडथळे निर्माण करू शकते, यामुळे रेडिओ सिग्नल किंवा जीपीएसमध्ये गडबड होऊ शकते. परंतु एक सौर सुपरफ्लेयर अत्यंत अधिक शक्तिशाली असते. नियमित फ्लेयरच्या तुलनेत यातून लाखो पट अधिक ऊर्जा निघणार आहे. हा विस्फोट प्रकाशाच्या वेगाने होतो, अशा स्थितीत त्यांना पृथ्वीपर्यंत पोहोचण्यास काही मिनिटांचा कालावधी लागू शकतो.
छोट्या सौर ज्वाळा अस्थारी समस्या निर्माण करतात, परंतु एक सुपरफ्लेयर विध्वंसक ठरू शकते. हे उपग्रहांना नष्ट करू शकते. वीज ग्रिड बंद करू शकते आणि जगभरात संचार प्रणालींची यंत्रणा बिघडवू शकते. ही हानी अनेक दिवस किंवा आठवड्यापर्यंत राहू शकते, यामुळे दैनंदिन जीवनात महत्त्वपूर्ण समस्या निर्माण होऊ शकतात.
नव्या अध्ययनातून खुलासा
अहवालानुसार वेज्ञानिकांचे सूर्याची सुपरफ्लेय असते, परंतु ती अनेक हजारवर्षांमध्ये एकदाच उत्सर्जित होत असल्याचे मानणे हेते. डॉ. वॅलेरी वसीलीव्ह यांनी चालू महिन्यात सायन्स नियतकालिकात प्रकाशित एका अध्ययनात नवा खुलासा केल आहे. त्यांनी 50 हजारांहून अधिक ताऱ्यांच्या डाटाचे अध्ययन केले, त्या तऱ्यांना जवळपास 100 वर्षांमध्ये एकदा सुपरफ्लेयरचा अनुभव प्राप्त होतो. या नव्या शोधामुळे चिंता वाढली आहे. जर सूर्य सर्व अन्य ताऱ्यांप्रमाणेच वागणार असेल तर माणसांच्या अनुमानापेक्षा खूप अधिक सुपरफ्लेयर येणार आहेत. पृथ्वी यामुळे संकटात सापडू शकते.









