करवीर तालुक्यातील आदर्शवत पहिला उपक्रम
सांगरूळ प्रतिनिधी
ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्तआयोगातील निधीतून सांगरुळ धरण ते स्मशान भूमी पर्यंतच्या रस्त्याच्या बाजूला सौर दिवे लावण्याचे काम पूर्ण झाले आहे . गावाबाहेरील रस्त्यांच्या दुतर्फा सौर दिवे लावणारे सांगरुळ हे करवीर तालुक्यातील पहिले गाव आहे .
सांगरूळ ते सांगरुळ धरण या मार्गावर पहाटे पाच पासून व्यायामासाठी फिरायला जाणाऱ्यासह इतर कामासाठी जाणाऱ्या नागरिकांची मोठी वर्दळ असते.यामध्ये शालेय विद्यार्थी व तरुणांसह जेष्ठ नागरीकांचा समावेश असतो .व्यायामासाठी फिरायला जाणाऱ्यामध्ये महिलांची संख्या ही मोठी असते . गावापासून स्मशानभूमी पर्यंत ग्रामपंचायतीचे पथदिवे कार्यान्वित आहेत . पण सांगरुळ धरण ते स्मशान भूमी पर्यंतच्या साधारणता अडीच किलोमीटरच्या रस्त्यावर पथदिवे नसल्याने नागरिकांना प्रवास करताना अंधाराशी सामना करावा लागत होता.
या मार्गावरील नागरिकांची सुरक्षितता म्हणून ग्रामपंचायतीने पंधराव्या वित्त आयोगातून या मार्गावर ठिकठिकाणी सौर दिवे लावण्याचा निर्णय घेतला .यानुसार काम पूर्ण करून त्या कामाचा शुभारंभ गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांच्या हस्ते करण्यात
आला. तसेच यावेळी ग्रामपंचायतीच्या पाच टक्के निधीतून गावातील पन्नास दिव्यांगाना दीड लाख रुपयांच्या मदतीचा निधी त्यांच्या बँक खात्यावर वितरित करण्यात आला.
सुरुवातीस स्वागत व प्रास्ताविक करताना उपसरपंच सुभाष सुतार यांनी ग्रामपंचायतीत सत्ता आल्यापासून गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक जनहिताची कामे सुरू आहेत . ग्रामस्थांच्या सहकार्याने यापुढेही गावांमध्ये चांगल्या प्रकारची दर्जेदार विकास कामे करण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे, सरपंच शितल खाडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष कृष्णात खाडे ,कुंभीचे माजी संचालक भरत खाडे , बाळासो यादव, सतीश तोरस्कार, एन डी खाडे ,लहुजी सासणे, एम बी खाडे दीपक घोलपे , बदाम खाडे, रवींद्र खाडे ,सरदार खाडे ,सचिन लोंढे, मुरली कासोटे,सागर खाडे बाळासाहेब खाडे, सचिन नाळे ,गजानन शिंदे ,बाळासाहेब म्हेतर, संभाजी आंबी उत्तम कासोटे सचिन यादव ग्रामविकास अधिकारी अमोल काजवे उपस्थित होते .
नाममात्र किमतीत सॅनिटरी नॅपकिन
ग्रामपंचायतीच्या वतीने गावात दोन ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन मशीन बसवण्यात आले आहे . यासाठी दोन रुपये नाममात्र किंमत आकारली जाते . यातून महिन्याला ८०० ते ९०० सॅनिटरी नॅपकिची विक्री होत आहे त्याचा वापर वाढत आहे . महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे .
ग्रामविकास अधिकारी अमोल काजवे यांचा सत्कार
ग्रामविकास अधिकारी अमोल काजवे यांच्या प्रभावी व नियोजनबद्ध प्रशासकीय कामकाजामुळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात विविध प्रकारची सार्वजनिक विकास कामे व वैयक्तिक लाभाच्य्या शासकीय योजनांची कार्यवाही चांगल्या प्रकारे सुरू आहे . याबद्दल ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने ग्रामविकास अधिकारी काजवे यांचा सत्कार करण्यात आला .









