सूर्यप्रकाश एकत्र करत पृथ्वीवर पाठविणार उपग्रह
अंतराळातून लवकरच सौरऊर्जा एकत्र करत पृथ्वीवर मायक्रोवेव्ह्जद्वारे वीजेचा पुरवठा केला जाऊ शकतो. ब्रिटनच्या स्पेस एनर्जी एनिशिएटिव्हचे (एसईआ) सह-अध्यक्ष मार्शियन सोल्ताऊ यांच्यानुसार 2035 पर्यंत हे शक्य होऊ शकते. सध्या त्यांची टीम प्रोजेक्ट ‘कॅसिओपेओ’वर काम करत आहे. यात पृथ्वीच्या उच्च कक्षेत मोठमोठे उपग्रह पाठविले जाणार आहेत.

सौरऊर्जा तयार करणार उपग्रह
उच्च कक्षेत पाठविण्यात येणारे उपग्रह सौरऊर्जेची निर्मिती करतील आणि ती पृथ्वीकडे पाठवतील. या प्रकल्पाची क्षमत अमर्याद आहे. प्रत्यक्ष स्वरुपात 2050 मध्ये जगाच्या सर्व ऊर्जेचा पुरवठा यातून होऊ शकतो असा दावा सोल्ताऊ यांनी केला आहे. अंतराळात सूर्याची ऊर्जा प्रचंड आहे आणि पृथ्वीच्या उच्च कक्षेत मोठय़ा उपग्रहांसाठी मोठी जागा आहे. पृथ्वीच्या जियोस्टेशनरी ऑर्बिटच्या (भूस्थिर कक्षा) चहुबाजूला दरवर्षी 100 पट अधिक सौरऊर्जा प्राप्त होऊ शकते. एवढीच ऊर्जा पृथ्वीवर माणसांकडून 2050 मध्ये वापरली जाण्याची शक्यता आहे.
उपग्रह कसे काम करणार?
हे उपग्रह प्रकल्पात तयार होणाऱया लाखो छोटय़ा-छोटया मॉडल्सना मिळून तयार होतील. अंतराळात रोबोट्सच्या मदतीने त्यांना असेंबल करण्यात येणार आहे. हेच रोबोट्स त्यानंतर देखभाल आणि सव्हिर्सिंगही करतील. उपग्रह सौरऊर्जेला हाय फ्रीक्वेंसी रेडिओ वेव्ह्जमध्ये बदलून त्यांना अँटेनाद्वारे पृथ्वीवर पाठवतील. त्यानंतर या रेडिओ वेव्ह्जना वीजेत रुपांतरित करण्यात येईल. प्रत्येक उपग्रह 2 गीगावॅट वीज निर्मिती करण्यास सक्षम असणर आहे.
अमेरिकेतही प्रकल्पाची तयारी
अमेरिकेची एअर फोर्स रिसर्च लेबोरेटरी देखील अशाच प्रकारच्या तंत्रज्ञानावर काम करत आहे. या प्रकल्पाचे नाव स्पेस सोलर पॉवर इंक्रीमेंटल डिमोंस्ट्रेशन अँड रिसर्च आहे. यात सोलर सेल्स तयार करत सौरऊर्जेला रेडिओ वेव्ह्जमध्ये बदलून वीजेचे उत्पादन करणे सामील आहे.









