प्रतिनिधी / सोलापूर
जिल्हा परिषदेच्या आरक्षणाची सोडत आज जाहीर करण्यात आली. त्यामध्ये आष्टी गटामध्ये जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व पाच वषी जि.प. बांधकाम समितीचे सभापती राहिलेले विजयराज डोंगरे यांचा आष्टी गट अनुसूचित महिलासाठी राखीव झाल्याने त्यांना मोठा धक्का बसला तर पेनूर गट हा सर्वसाधारण पुरुषांसाठी सोडला तर सर्वच गट आरक्षित झाले आहेत. त्यामुळे प्रस्थापितांना मोठा धक्का बसला.
नरखेड गटामध्ये विद्यमान जिल्हा परिषद सदस्य व राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांना त्यांचा गट जनरल महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.
पेनूर गटामध्ये यापूर्वी अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने त्या ठिकाणाहून शिवाजी सोनवणे हे राष्ट्रवादीमधून विजयी झाले होते. आता तो राखीव झाल्यामुळे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे यांना मोठी संधी मिळत आहे.
जिल्हा परिषदेचे आरक्षण पुढील प्रमाणे : पेनूर सर्वसाधारण, पोखरापूर अनुसुचित जाती, नरखेड सर्वसाधारण महिला, आष्टी अनुसूचित जाती महिला, कुरुल ओबीसी महिला, कामती सर्वसाधारण महिला असे राखीव अरक्षण जाहीर झाले. कुरुल गटातून भीमा परिवारतर्फ विजयी झालेल्या पंढरपूरच्या शैलजा गोडसे यांना देखील त्यांचा गट ओबीसी महिला झाल्याने त्यांना जागा राहिली नाही. कामती गटातून भीमा परिवार गटातून विजयी झालेले कै. तानाजी खताळ यांचा गट पुन्हा सर्वसाधारण झाला. यापूर्वी त्यांच्या पत्नी विजयी झाल्या त्या नंतर कै. तानाजी खताळ विजयी झाले होते. आता नुकतेच राष्ट्रवादीत प्रवेश केलेले त्यांचे सुपुत्र अक्षय खताळ यांना विजयासाठी मार्ग मोकळा झाला. पोखरापूर गटातून अनुसूचित पुरुषासाठी राखीव झाल्याने शिवसेनेचे सोमेश क्षीरसागर यांनी पुन्हा दंड थोपटले आहेत. गत वेळचा पराभवाचा वचपा काढणार अशी चर्चा सुरु आहे. एकंदरीत प्रस्थापितांना धक्का तर नवोदितांना संधी असे आरक्षणानंतर चित्र दिसत आहे.
करमाळा तालुक्मयात जिल्हा परिषदेच्या 6 व पंचायत समितीच्या 12 गणांसाठी गुरुवारी आरक्षण जाहीर झाले. जिल्हा परिषदेसाठी सोलापुरात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या उपस्थितीत तर पंचायत समितीसाठी तहसीलदार समीर माने यांच्या उपस्थित हे आरक्षण जाहीर झाले.