गटांची संख्या होणार कमी; आरक्षण नव्याने
गौतम गायकवाड / सोलापूर
महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या 2017 च्या प्रभाग रचनेनुसार घेण्याचा निर्णय तसेच राज्य निवडणूक आयोगाने घेतलेला जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया स्थगितीचा नव्या निर्णयामुळे पुन्हा एकदा जिह्याच्या राजकारणातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. आता आरक्षण देखील नव्याने काढले जाणार आहे. यामुळे जिह्यातील नेतेमंडळींना तसेच इच्छुकांना नव्याने राजकीय गोळाबेरीज करावी लागणार आहे.
राज्य शासनाने नुकताच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या 2017 च्या प्रबाग रचनेनुसार घेण्याचा निर्णय घेतला असल्याने आता पुन्हा एकदा नव्याने झालेली प्रभाग रचना रद्द करावी लागणार आहे. तर सर्व गट व गणांचे आरक्षणही dाता नव्यानेच काढावे लागणार आहे. तेव्हा नुकत्याच झालेल्या आरक्षण सोडतीवर राजकीय क्षेत्रात मात्र कही खुशी तर कही गम अशी अवस्था पाहायला मिळत आहे.
नव्या निर्णयामुळे जिल्हा परिषदमधील सदस्य संख्या ही किमान 50 तर कमाल 75 करण्यात येणार आहे. सोलापूर जिल्हा परिषदेलाही या निर्णयाचा मोठा फटका बसणार आहे. येथील सदस्य संख्या ही 68 होती त्यामध्ये बदल होऊन ती 77 करण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्या सदस्य संख्येत 9 जागांची वाढ करण्यात आली होती.
यामध्ये अनु, जातीसाठी 12 जागा, अनु.जमातीसाठी 1 जागा तर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 20 जागा राखीव करण्यात आल्या होत्या तर 44 जागा या सर्वसाधारणसाठी आरक्षित करण्यात आल्या होत्या. तेव्हा शासनाच्या नव्या निर्णयामुळे ही सर्व आरक्षण प्रक्रिया रद्द होणार असल्याने राजकीय क्षेत्रात पुन्हा एकदा चर्चेला ऊत आला आहे. 2011 च्या जनगणणेनुसार व वाढीव लोकसंख्येनुसार ही प्रभाग रचना करण्यात आली होती. त्यातच जिह्यात नव्याने नगरपंचायती निर्माण झाल्या असल्याने या भागातील जिल्हा परिषदेची लोकसंख्या कमी होते. तर नव्याने नऊ सदस्य संख्या कोणत्या आधारावर वाढविण्यात आली असा प्रश्न निर्माण झाला. यामुळे या निर्णयाविरोधात जिह्यातील अनेकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे आक्षेप घेऊन हे आरक्षण चुकीचे असल्याने सांगितले होते. मात्र आता शासनानेच हा निर्णय रद्द केल्याने जिह्यात आता नव्या समीकरणाला सुरुवात होणार आहे. 77 जागांच्या आरक्षण सोडतीमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षणानुसार 39 जागा महिलांसाठी तर 38 जागा या पुरुषांसाठी आरक्षित होत्या. आरक्षणात काही ठिकाणी आनंद तर काही ठिकाणी नाराजी पाहावयास मिळत होती.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्वच्या सर्व सात जागा या महिलांसाठीच आरक्षित झाल्याने तालुक्यामध्येच नाराजी होती. तेव्हा आता सर्वच आरक्षण बदल होणार असल्याने जिह्यात सध्या कही खुशी तर कही गम असे वातावरण पहावयास मिळत असून पुढील काळात नव्याने आरक्षण आल्यास कोणते आरक्षण पडणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून पाहिले आहे.