सोलापूर : प्रतिनिधी
रेल्वेतून गांजाची तस्करी होत असल्यची धक्कादायक घटना आज उघडकिस आली. सोलापूर रेल्वे स्थानकात मुंबई- भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेसमधून गांजाची तस्करी होत असताना आपीएस पोलीस आणि लोहमार्ग पोलीस यांनी ही कारवाई केली. या कारवाईत ६६ हजारांच्या गांजासह एका इसमाला अटक केली आहे.
या बाबतीत अधिक माहीती अशी, सोलापूर रेल्वे स्थानकात आरपीएफ पोलीस आणि लोहमार्ग पोलिस गस्तीवर होते. त्याच वेळी मुंबई- भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेस आल्यानंतर आल्यानंतर त्यातून एक युवक सोलापूर रेल्वे स्थानकांवर उतरला. ड्युटीवर असलेल्या आरपीएफ पोलीस आणि लोहमार्ग पोलिस यांना त्या युवकाच्या हलचाली संशयास्पद वाटल्याने त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली.
प्रतीक हरिप्रसाद शमी वय २१, रा. गोल्डन नगर, रबाळे स्टेशन जवळ, नवी मुंबई असे नाव असलेल्या युवकाच्या झडतीमधून ६ किलो ६२० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. या गांजाची किंमत ६६ हजार होत असून पोलीसांनी तत्काळ कारवाई करून प्रतीक हरिप्रसाद शमी याला अटक केली. रेल्वेतून गांजाची तस्करी होण्याची पहिलीच घटना उघडकिस आल्याने अशा प्रकारे तस्करी करणारी टोळी सक्रिय आहे काय याचा शोध पोलीस घेत आहेत.