चार मुलींच्या पाठीवर जन्मला पृथ्वीराज; जनावरांच्या पाण्यासाठी खोदला होता खड्डा
प्रतिनिधी / करमाळा
कृषीपंपाला विद्युत पुरवठा करणारा ट्रान्स्फॉर्मर जळल्यामुळे शेतकऱ्याने शेतात जनावरांच्या पाण्यासाठी खड्डा खोदला होता. मात्र, त्याच खड्डय़ात बहीण-भावंडे जवळ कोणी नसताना उतरली आणि पोहता येत नसल्याने बुडून त्यांचा मृत्यू झाला.
हिंगोली जिह्यातील ऊसतोड मजूर हे करमाळा तालुक्मयात ऊसतोडणीसाठी आले होते. त्यांचे काम पांगरे (ता. करमाळा) येथे सुरू असताना लहान मुले ही काही अंतरावर असलेल्या गायरानात खेळत होती. त्याठिकाणी पाण्याचा मोठा खड्डा होता. त्या डबक्यात त्या दोघांचे मृतदेह आढळून आले आहेत. उशिरापर्यंत मुले का येत नाहीत म्हणून याचा शोध घेतला त्यावेळी घटना उघडकीस आली.
प्रतीक्षा श्रावण चव्हाण व पृथ्वीराज श्रावण चव्हाण अशी मृत मुलांची नावे आहेत. त्यांचे कुटुंब शेगाव येथून आले होते. पृथ्वीराज हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा आहे. ही घटना रविवारी दुपारी उघडकीस आली आहे.
प्रतीक्षा व पृथ्वीराज हे आपल्या कुटुंबासमवेत करमाळ्यातील पांगरी येथे आले होते. सकाळी कुटुंबीय ऊसतोडणीत व्यस्त असताना दोन्ही मुले ठिकाणाहून काही अंतरावर असलेल्या गायरान जमिनीकडे गेली. त्या ठिकाणी एक पाण्याचा मोठा खड्डा होता. त्यात पाणी असल्याने परिसरात ते खेळत असताना दोघांनाही अंदाज आला नसावा. त्या डबक्मयात दोघं पडले. त्यानंतर बराच काळ शोधाशोध केल्यानंतर दोघांचा मृतदेह त्या पाण्यात आढळून आला. पांगरे येथील गायरान जमिनीतील पाण्याच्या खड्डय़ामध्ये पडल्याने त्यांना उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. बंडगर यांनी दोन्ही मुलांना तपासून उपचारापूर्वीच मृत पावल्याचे सांगितले.