कुर्डुवाडीशी संपर्क तुटला; तालुक्यात 60 मिमीपेक्षा जास्त पाऊस
प्रतिनिधी / कुर्डुवाडी
माढा तालुक्यातील ढवळस परिसरात गुरुवारी रात्री ते शुक्रवारी पहाटेपर्यंत ढगफुटीसदृश पाऊस झाला. तालुक्मयातील अनेक भागातील रस्ते बंद झाले, बेंद ओढा दुथडी भरून वाहू लागला. कुर्डुवाडीत सरासरी 48.3 मि.मी. पाऊस झाला तर माढा तालुक्मयात सरासरी 60.5 मि.मी.पाऊस झाला. नागरिकांना पर्यायी रस्त्याचा अवलंब करावा लागत आहेत. यामुळे चाकरमान्यांचे मोठे हाल झाले.
ढवळस, पिंपरी जाखले, भोगेवाडी आदी ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने ताली, बंधारे फुटून वाहू लागले. जाखले चोभे पिंपरी येथील पाझर तलाव फुटल्यामुळे शेतकऱयांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पिके, फळबागांचे मोठे नुकसान झाले.
करमाळा तालुक्मयातील केम परिसरातही मोठय़ा प्रमाणात पाऊस झाल्याने आजूबाजूच्या गावाशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे शाळांना सुटी जाहीर करण्यात आली होती. शेतकऱ्यांच्या पिकांचे भयंकर नुकसान झाले आहे. शेतकऱयांची जनावरे वाहून गेली आहेत. शेतकरी, व्यापारी, छोटे मोठे दुकानदार यांचे खूप नुकसान झाले आहे.
कुर्डुवाडी शहर व परिसरात गुरुवारी दुपारपासून शुक्रवारी पहाटेपर्यंत ठराविक अंतराने झालेल्या मुसळधार पावसाने परिसरातील ओढे, नाले, तुडूंब होऊन दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे तालुक्मयातील अनेक रस्त्यांचा संपर्क तुटला. गेला दशकभरातील हा पहिला पाऊस ज्याने खऱया अर्थाने सीमोल्लंघन केले. कुर्डुवाडीत सरासरी 48.3 मि.मी. पाऊस झाला तर माढा तालुक्मयात सरासरी 60.5 मि.मी.पाऊस झाला. या पावसामुळे शेती, फळबागा व नागरिकांच्या संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच म्हशी, गायी, कोंबडय़ाही या पाण्यात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. सामाजिक कार्यकर्ते पाण्यात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीला धावून आले. प्रशासन मात्र चित्रपटाप्रमाणे उशिराने आले.
करमाळा व माढा तालुक्मयात काही पाझर तलाव फुटल्याने टेंभुर्णी, घाटणे, पंढरपूर व माढय़ाकडे जाणारे रस्ते बंद झाले. चाकरमानी, वाहनधारक, नागरिकांना बाह्यवळण व पर्यायी मार्गाने आपले इच्छित स्थळ गाठावे लागले.
टेंभुर्णी रोड परिसरातील ओढय़ालगत असणाऱया वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी कमरेएवढे प्रत्येक घराघरात शिरले होते. अथर्व हॉटेल, जिव्हाळा शाळा, कुर्डुवाडी ब्लड बँक, सुमारे 500 मीटरचा परिसर पूर्णपणे पाण्याने वेढला गेला होता. टेंभुर्णी रोडवरील पुलावरून वेगाने पाणी वाहात असल्यामुळे टेंभुर्णीकडून कुर्डुवाडी शहरात येणारी वाहतूक ठप्प झाली होती. तर कुर्डू शिवारातील गोरे वस्तीनजीकच्या रेल्वे पुलाला केवळ दीड फूट पाणी टेकायचे बाकी होते.
या पावसाने ओढय़ाला आलेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे विजेचे खांब कोसळले त्यामुळे पहाटेपासून शहराचा विद्युतपुरवठा खंडित झाला होता.
या पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड, सहा.पो.नि.विक्रांत बोधे, आरोग्य निरीक्षक जयसिंग लोखंडे, अभियंता शुभम शिंदे आदींनी पाहणी केली असून पाणी ओसरल्यानंतर पंचनामा करण्यात येणार आहे.
रब्बीच्या पेरण्या पुन्हा लांबणार
खरिपाची पेरणी पाऊस वेळेत न झाल्याने होऊ न शकल्याने खरीप हातून गेला तर आता रब्बीत प्रमाणापेक्षा अधिक पाऊस झाल्याने आठ दिवस तरी पेरण्या शक्मय होणार नसून पुढे जर पोषक वातावरण न लागल्यास रब्बीही हातातून निसटण्याची शक्मयता असल्याचे शेतकरी सांगत आहेत.