मध्यरात्रीची घडली घटना
सोलापूर : सोलापुरातिल महावीर चौकात दुचाकी झाडाला धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन तरूण जागीच मॄत्यू पावले. ही दुदैवीॅ घटना रविवारी मध्यरात्री 1.30 सुमारास घडली.
निखिल कोळी (वय २४ ) आतिश सोमवंशी (वय २२ )व इरण्णा मठपती (वय २४) असे मरण पावलेल्या तिघा युवकांची नावे असल्याचे समजते. हे सर्व तरूण जुळे सोलापूर भागात राहण्यास असल्याची चर्चा सिव्हील परिसरात आहे.
निखील,आतिश.व इरणंणा हे तिघे मित्र होते, ते रविवारी रात्री दीडच्या सुमारास दुचाकी वरून घराच्या दिशिने जात होते. धरम्यान, महावीर चौकात त्यांची दुचाकी तेथील झाडाला जोरात धडकली. या भीषण अपघातानंतर तिघेही रस्त्यावर पडले.यात , त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते जागेवरच मरण पावले. शासकीय रूग्णालय्त नातेवाईकांनी तसेच त्या तिघांच्या मित्रांची गर्दी झाली आहे.








