Pakistan Foreign Minister Bilawal Bhutto News : पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान मोदींविरोधात केलेल्या वक्तव्याविरोधात भाजप सोलापूर शहराच्यावतीने भाजप कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करून पाकिस्तानसोबत बिलावल यांच्या पुतळ्याचे दहन केले. याप्रसंगी बोलताना आमदार सुभाष देशमुख म्हणाले,पाकिस्तानची ढासळती अर्थव्यवस्था,अराजकता,लष्करातील मतभेद आणि बिघडत चाललेले जागतिक संबंध यापासून जगाला वळवणे आणि दिशाभूल करणे हे या वक्तव्याचे उद्दिष्ट आहे.
विभागीय संघटन मंत्री मकरंद देशपांडे म्हणाले,रशिया-युक्रेन संघर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने पाकिस्तानी विद्यार्थ्यांना कसे वाचवले हे जगाने पाहिले आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जागतिक व्यासपीठावर आपली अमिट छाप सोडली आहे,पण दुसरीकडे पाकिस्तानची थट्टा आणि अपमान सहन करावा लागत आहे. बिलावल यांनी ज्या प्रकारची भाषा वापरली आहे ती निषेधार्ह आहे.राजकारणाचा भावही प्रतिबिंबित करत नाही. रेंद्र मोदींवर भाष्य करण्याइतपत बिलावल यांचा कौल योग्य नाही असेही ते म्हणाले.
Tarun Bharat is a Marathi newspaper based in Belagavi, India. It is the seventh-largest-selling Marathi daily newspaper in the country. The paper has eight editions from locations in North Karnataka Southern Maharashtra Konkan, Mumbai and Goa. Baburao Thakur founded the newspaper 1919 during the British colonial era.