सोलापूर,प्रतिनिधी
Solapur Accident News : अक्कलकोट रोड एमआयडीसी येथील रुपम इंडस्ट्रीजमध्ये बुधवारी पहाटेच्या सुमारास स्फोट झाला.यात तीन मजुरांचा होरपळून मृत्यू झाला.तर दोन कामगार प्रंसंगावधान राखून बाहेर पडल्याने बचावले. मनोज देहुरी,आनंद बगदी व सोहादेव बगदी (सर्व रा.बिहार राज्य) असे मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, येथील कामगार बुधवारी पहाटे स्वंयपाक करत होते.त्यावेळी गॅसचा स्फोट झाला.आगीच्या घटनेची माहिती
मिळताच,अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.दहा गाड्या मारून आग नियंत्रणात आणण्यात आली आहे.दरम्यान, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.









