हुबळीच्या कंपनीकडून कामाला गती : जानेवारीपासून होणार सुऊवात
बेळगाव : नियोजित जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीसाठी राज्य सरकारकडून 100 कोटी अनुदान मंजूर करण्यात आले आहे. त्यानुसार इमारतीच्या बांधकामासाठी आवश्यक असणाऱ्या कामांची पूर्तता केली जात असून इमारत उभारण्यासाठी जमिनीचा दर्जा तपासण्याचे काम हुबळी येथील कंत्राटी कंपनीकडून सुरू करण्यात आले आहे. कंपनीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 10 पेक्षा अधिक मजली इमारत उभारली जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. नियोजित जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कामाला येत्या जानेवारीपासून सुऊवात करणार असल्याचे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यामध्ये बांधकामासाठी 100 कोटी अनुदान मंजूर करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून इमारतीच्या जागेचा सर्व्हे करण्यात आला आहे. त्यासाठी आवश्यक ठिकाणी ख•s खणून माती परीक्षण करण्यात आले आहे.
सहा मजली इमारत साकारणार
आता कंत्राटी कंपनीकडून ख•s खणलेल्या ठिकाणी यंत्राच्या साहाय्याने खोदाई करून जमिनीचा दर्जा पाहिला जात आहे. गेल्या चार दिवसांपासून हे काम सुरू आहे. त्यामुळे कामाला लवकरच सुऊवात करण्यात येणार असल्याचे दिसून येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाची नियोजित इमारत 145 मीटर लांब आणि 71 मीटर रुंद असणार आहे. यामध्ये दोन मजली बेसमेंट तर चार माजली कार्यालये अशी एकूण सहा मजली इमारत उभारली जाणार आहे.
2 एकर जागेचे संपादन
सध्या असणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील 2 एकर जागा संपादित केली जाणार आहे. यामध्ये दोन पदरी रस्ते, दोन्ही बाजूला प्रवेशद्वार, उद्यान, पार्किंग व्यवस्था आदींचा समावेश आहे. हुबळी येथील कंपनीला कंत्राट मिळाले असून त्यांनी मातीचा दर्जा तपासण्याचे काम हाती घेतले आहे. यंत्राद्वारे मातीचा दर्जा तपासण्यात येत आहे. त्या माध्यमातून जमिनीमध्ये किती अंतरावर दगड आहे, याची तपासणी केली जात आहे.
पुढील प्रक्रिया प्रयोगशाळेत
पाच ते सहा मीटर अंतरावर दगड लागत असून उत्तम दर्जाची जमीन असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. अशा ठिकाणी 10 ते 12 मजली इमारत उभारली जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. असे असले तरी अद्याप बांधकाम खात्याच्या प्रयोगशाळेत याची तपासणी करूनच पुढील प्रक्रिया केली जाणार आहे.









