प्रतिनिधी / बेळगाव :
श्रीक्षेत्र सोगल सोमनाथ येथील सोमेश्वर मंदिरात सोमवारी तिसर्या श्रावण सोमवार निमित्त रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. चांदीच्या रथातून भगवान शंकराच्या जयघोषात मंदिर परिसरात रथोत्सव काढण्यात आला. हजारो भाविकांनी या रथोत्सवामध्ये सहभाग घेतला.
श्रावण सोमवार निमित्त सकाळी रूद्राभिषेक व दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. चांदीच्या रथाला केळीचे खांब, ऊस, नारळाच्या झावळय़ा, फुले, आणि आंब्याच्या पानांच्या तरणाने सजविण्यात आले होते. रथात सोमेश्वराच्या चंदीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. संध्याकाळी होसूर येथील गुरू मडिवाळेश्वर मठाचे गंगाधर स्वामीजी आणि होसूर बैलहोंगलच्या प्रभू निलकंठ स्वामीजी यांनी पूजा करून रथोत्सवाला सुरूवात झाली. भक्तांनी रथावर अंजीर, केळी अर्पन केली.
मल्लूर पूरवंतांचा वडपू, नंदीकोलू यासह विविध वाद्यांमुळे रथोत्सवामध्ये वेगळाच उlसाह निर्माण झाला होता. आमदार महांतेश कौजलगी, मोहनानंद स्वामीजी यांच्यासह हजारोंच्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.