ट्रेडिंग अॅपच्या माध्यमातून फसवणूक
प्रतिनिधी/बेळगाव
ट्रेडिंग अॅपमध्ये गुंतवणूक केल्यास नफा देण्याचे सांगून बेळगाव येथील एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला सायबर गुन्हेगारांनी 1 कोटी 7 लाख रुपयांना ठकविले आहे. या घटनेने एकच खळबळ माजली आहे. यासंबंधी शहर सीईएन पोलीस स्थानकात संबंधित ऑनलाईन कंपनीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक बी. आर. ग•sकर पुढील तपास करीत आहेत. सायबर गुन्हेगारांकडून झटपट नफ्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्याचे प्रकार सुरूच आहेत.
वडगाव येथील एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने ट्रेडिंग अॅप डाऊनलोड करून एका कंपनीत 15 लाख रुपये सुरुवातीला गुंतविले होते. त्याच्या बदल्यात त्याला 7 लाख रुपये नफा देण्यात आला. बँकेत पैसे काढण्यासाठी गेले असता ते पैसे मिळाले. त्यामुळे या अॅपवर त्याला विश्वास बसला. त्याने टप्प्याटप्प्याने तब्बल 1 कोटी 7 लाख रुपये गुंतविले. त्याच्या खात्यात नफ्यादाखल 11 कोटी रुपये जमा दाखविण्यात आले. मात्र प्रत्यक्षात पैसे जमा नव्हते. आपण फसलो गेलो हे लक्षात येताच त्याने सीईएन विभागात फिर्याद दिली आहे.









