वृत्तसंस्था / टोकियो
येथे सुरू असलेल्या पॅन पॅसिफीक खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत अमेरिकेची सोफीया केनिनने एकेरीत विजयी सलामी देताना चीनच्या झीनयुचा पराभव केला.
सोफिया केनिनने यापूर्वी ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम जेतेपद मिळविले होते. पहिल्या फेरीतील सामन्यात तिने चीनच्या झीनयु चा 6-1, 6-4 असा पराभव करत विजयी सलामी दिली. 25 वर्षीय केनिनने 2020 साली ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेचे जेतेपद मिळविले तर त्याच वर्षांमध्ये तिने फ्रेंच ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.









