वृत्तसंस्था / टोकियो
डब्ल्युटीए टूरवरील येथे सुरु असलेल्या पॅन पॅसिफीक खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत माजी ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम विजेती सोफिया केनिनने एकेरीची अंतिम फेरी गाठताना नवव्या मानांकित ब्रिटनच्या बोल्टरचा पराभव केला.
2020 साली ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा जिंकणाऱ्या अमेरिकेच्या केनिन उपांत्य सामन्यात बोल्टरचा 6-4, 6-4 अशा सरळ सेटस्मध्ये पराभव केला. रविवारी या स्पर्धेतील अंतिम सामना खेळविला जाईल. चीनची क्विनवेन आणि डायना स्नेडर यांच्यात दुसरा उपांत्य सामना होणार असून या सामन्यातील विजयी खेळाडूबरोबर केनिनचा अंतिम सामना होईल.









