प्रतिनिधी/ बेळगाव
बुक लव्हर्स क्लबच्या बैठकीत ‘बालभूषणांनी’ हा लघुपट दाखविण्यात आला. समलिंगी या नाजूक विषयावरील संस्कृत भाषेतील हा पहिलाच लघुपट आहे. त्याचे लेखन बेळगावच्या मेधा मराठे यांनी केले असून संस्कृत भाषांतर डॉ. आशा गुर्जर फडके यांनी केले आहे. पटकथा व दिग्दर्शन चिन्मय शेंडे यांचे तर संकलन संकेत कुलकर्णी यांचे आहे.
यामध्ये अभिजित देशपांडे, अमेय पाटणकर, आरती आपटे व मेधा मराठे यांनी काम केले आहे. लघुपटातील कलाकारांसह दिग्दर्शक, लेखक, समुपदेशक अंजली पंडित, समाजसेविका गौरी गजबर व ह्युमॅनिटी फौंडेशनचे तानाजी सावंत यांनी चर्चेत भाग घेत समाज व सरकारची मानसिकता स्पष्ट केली. जगण्याचा हक्क सर्वांनाच आहे. आजही अर्ज भरताना स्त्राr-पुरुष व अन्य भरावे लागते, हा बदल अलीकडे झाला आहे. मात्र, या विषयावर अधिक चर्चा होणे आवश्यक आहे, असे मत यावेळी व्यक्त झाले. बुलकचे अध्यक्ष चैतन्य हलगेकर यांनी स्वागत केले.









