‘संपर्क ते समर्थन’ अंतर्गत उपक्रम
सांगे : भाजपच्या संपर्क से समर्थन कार्यक्रमा अंतर्गत सांगेचे आमदार आणि समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगे मतदारसंघातील रिवण येथील काही प्रमुख मतदारांच्या भेटी घेऊन केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या उपलब्धी पुस्तिका प्रधान केल्या. तर याच उपक्रमाअंतर्गत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि मडगांवचे आमदार दिगंबर कामत यांनी सांगे नगरपालिका क्षेत्रातील काही प्रतिष्ठीत नागरिकांच्या गाठी भेटी घेतल्या. भाजपतर्फे सांगे मतदारसंघात महा जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. भाजप हा सतत कार्यरत राहणारा पक्ष असूनठ संपर्क से समर्थन ठ जोडू पाहत आहे. केंद्रात मोदी सरकारला नहू वर्षे पूर्ण झाली आहेत. तसेच राज्यात डॉ. प्रमोद सावंत यांनी चार वर्षे यशस्वी मुख्यमंत्री म्हणून शबी निर्माण केली आहे. देशातील सर्वात लोकप्रिय पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी कडे पाहिले जाते. नहू वर्षातील उपलबधि आम्ही जनतेसमोर ठेवत आहे असे फळदेसाई यांनी सांगितले. भाजप नेते, मंत्र्याकडून सांगे मतदारसंघातील पन्नास प्रतिस्थित लोकांच्या गाठी भेठी घेण्याचा कार्यक्रम पूर्ण झाला आहे. या अंतर्गत फळदेसाई यांनी रिवण येथिल काही प्रमुखांच्या भेटी घेतल्या. रिवण ग्रामपंचायत विस्तार आणि नूतनीकरण प्रकल्प हाती घेतल्याबद्दल यावेळी भेटी घेतलेल्या प्रमुखांनी फळदेसाई यांचे अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची मान आणि शान वाढविली असून लोकंकल्याण आणि देशहीत डोळ्यासमोर ठेऊन कार्य करीत असल्याचे फाळदेसाई यांनी सांगितले. गोव्यातही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उत्तमरित्या कार्य करीत आहे. यावेळी रिवण ग्रामपंचायत सरपंच वैशाली नाईक, जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर, उपसरपंच सूर्या नाईक इत्यादी हजर होते.









