अध्यक्ष सिद्धार्थ सोन्नद : रोटरी क्लब ऑफ एलिट चार्टर क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी स्वीकारला पदभार
प्रतिनिधी / बेळगाव
रोटरी क्लबचे मुख्य उद्दिष्ट समाजसेवा असून रोटरी संलग्न सर्व संस्थांच्या सहकार्याने सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे मत रोटरी क्लब ऑफ एलिटचे अध्यक्ष सिद्धार्थ सोन्नद यांनी व्यक्त केले.
बेळगावात नुकत्याच अस्तित्वात आलेल्या रोटरी क्लब ऑफ एलिटचे नूतन अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. ते म्हणाले, रोटरीने आपली सेवा समाजसेवेसाठी वाहून घेतली आहे. या दिशेने आतापर्यंत अनेक प्रकल्प राबविण्यात आले आहेत. आगामी काळातही या क्लबच्या माध्यमातून आणखी सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. अधिकारग्रहण सोहळ्याचे उद्घाटक जिल्हा सदस्यत्व सचिव डॉ. लेनी डा. कोस्टा म्हणाले की, समाजसेवेत रोटरी क्लबची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. हे क्लब उत्तमप्रकारे व्यवस्थापित आहे. रोटरी संघातील सदस्यांमध्ये नेतृत्वगुण विकसित करण्यास मदत करते. अशाप्रकारे रोटरी संस्था समाजातील सर्व स्तरातील लोकांना अनेक प्रकारे मदत करत असल्याचे त्यांनी सांगितले.
रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पुरस्कृत नवीन रोटरी क्लब ऑफ एलिट चार्टर क्लबच्या अध्यक्षपदी सिद्धार्थ सोन्नद, सचिवपदी डॉ. धवल चिवटे, खजिनदार म्हणून अभिजीत कुलकर्णी व सीए जयकुमार पाटील यांनी सनदी अध्यक्ष म्हणून पद्भार स्वीकारला. यावेळी रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3170 चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर व्यंकटेश देशपांडे, सीए संजय कुलकर्णी, अशोक नाईक, माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आनंद कुलकर्णी, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष हेमेंद्र पोरवाल, विक्रम जैन, तसेच रोटेरीयनचे इतर ज्येष्ठ नागरिक व कुटुंबीय उपस्थित होते. सीए जयकुमार पाटील आभार मानले.