प्रतिनिधी/ बेळगाव
बेननस्मिथ हायस्कूल व बेळगाव गटशिक्षणाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बेननस्मिथ शाळेमध्ये समाजविज्ञान विषय शिक्षकांची कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज : काल, आज आणि उद्या’ या विषयावर ईश्वर पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका एस. जी. गुंडी होत्या.
व्यासपीठावर समाजविज्ञान विषयाचे नोडल अधिकारी एन. डी. पाटील, फोरमचे अध्यक्ष विश्वास गावडे, रणजित चौगुले उपस्थित होते. सुनीता बानीकट्टी यांनी बायबल पठण केले. सुनीता मुडलगी यांनी प्रार्थना सादर केली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी सुषमा भोरे, राम गुरव, वंदना कामत यांच्यासह इतर शिक्षक उपस्थित होते. त









