शेजाऱ्यांशी संवाद साधत राहिल्यास होणार मानसिक लाभ
व्यस्ततेमुळे सध्या लोक केवळ घर किंवा वर्कप्लेसपुरती मर्यादित राहिले आहेत. याचमुळे लोक सामाजिकदृष्ट्या एकाकी पडले आहेत. चॅरिटी टू एंड लोनलीनेस पॅम्पेनच्या अहवालानुसार ब्रिटनमध्ये 40 लाख लोक दीर्घकाळापासून एकाकीपणाला तोंड देत आहेत. या समस्येवर मात करण्याचा सर्वात चांगला उपाय संभाषण करणे आहे. शेजारी राहणाऱ्यांशी सकारात्मक चर्चा केल्यास शारीरिक आणि भावनात्मक लाभ होण्यासह सामाजिक कक्षाही मजबूत होते.
सामाजिक संबंध टिकवून ठेवणे म्हणजे आरोग्यासाठी गुंतवणूक केल्यासारखे असल्याचे उद्गार कोलंबिया विद्यापीठाच्या इरविंग मेडिकल सेंटरमधील मनोचिकित्सक केली हार्डिंग यांनी काढले आहेत. शेजारी किंवा अनोळखीशी बोलल्याने त्यांच्या आणि आपल्या मानसिक आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पडत असतो, असे ब्रिटिश वैज्ञानिक डॉ. मायकल मोस्ले यांचे सांगणे आहे. शेजाऱ्यांना मदत करणे एकाकीपणा कमी करण्याची शक्तिशाली पद्धत असल्याचे मँचेस्टर युनिव्हर्सिटीतील रिलेशनशिप एक्स्पर्ट पामेला क्वाल्टर यांनी सांगितले आहे.

प्राध्यापिका क्वाल्टर यांच्या निर्देशनात झालेल्या एका अध्ययनाच्या अंतर्गत लोकांना महिन्याभरापर्यंत आठवड्यातून एकदा शेजाऱ्याला कुठल्याही प्रकारची मदत करण्याचे काम करायचे होते. उदाहरणार्थ कचऱ्याची पेटी बाहेर ठेवणे, रस्त्यावर भेट झाल्यास बोलणे अशाप्रकारचे टास्क देण्यात आले होते. या कृतींमुळे दोन्ही बाजूंमध्ये एकाकीपणाची भावना कमी झाली तर एकतेच्या भावनेत वाढ झाल्याचे निष्कर्षांमध्ये दिसून आले आहे.
नैराश्याची शक्यता होते कमी
मेरीलँड युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार शेजाऱ्यांसोबत सामाजिक स्वरुपात जोडले गेल्याने आरोग्याशी निगडित समस्यांची जोखीम कमी होते. एकटेपणा न राहिल्याने चिंता अन् नैराश्याची शक्यता कमी होते. तसेच खराब झोप, हृदयरोग, स्ट्रोक किंवा अकाली मृत्यूचा धोका कमी होत असल्याचे प्राध्यापिका मेरिसा फ्रँको यांनी म्हटले आहे. शेजाऱ्यांशी संभाषण कमी होत असल्यास त्याची कारणं शोधा, अन् त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्या. स्वत:ची वाक्यं छोटी अन् विषयांवर केंद्रीत ठेवावीत. गोष्टींकडे समोरच्या व्यक्तीच्या दृष्टीकोनातून पाहण्याचा प्रयत्न करावा आणि दोघांना उपयुक्त ठरू शकेल असा तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा अशी सूचना तज्ञांनी केली आहे.
स्टोअरमध्ये चॅटर काउंटर
नेदरलँड्सच्या जम्बो सुपरमार्केटमध्ये 2021 मध्ये वृद्ध आणि एकाकीपणाला तोंड देणाऱ्या लोकांसाठी स्लो चेकआउट काउंटर सुरू करण्यात आले होते. घाई नसलेले लोक रांगेत उभ्या असलेल्या अनोळखी लोकांशी आरामात बोलू शकतात. स्टोअरमध्ये एकाकीपणा दूर करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.
प्लायमाउथ युनिव्हर्सिटीने नव्या अध्ययनाच्या अंतर्गत एकटे राहणाऱ्या लोकांना रोबोटिक मांजर अन् श्वान दिले होते









