ऑनलाईन टीम / तरुण भारत :
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर काल महत्वपूर्ण निकाल दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला पक्षाचे ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह मिळाले. त्यानंतर शिंदे गटाच्या नेत्यांनी सोशल मीडियावर धनुष्यबाण हे प्रोफाईल पिक्चर अपडेट करत एकप्रकारचा स्ट्राईक केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: ट्विटरवरील प्रोफाईल पिक्चर बदलले आहे.
तसेच उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, खा. श्रीकांत शिंदे यांच्यासह शिंदे गटाच्या जवळपास सर्वच नेत्यांनी आपले प्रोफाईल पिक्चर धनुष्यबाण केले आहे.
शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्याने ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.