व्हॉटसऍप, व्टिटर, इन्स्टाग्राम, फेसबुकवर हिंदी भाषेचा वापर; हिंदी भाषा देश-विदेशाता नंबर एकची दावेदार
अहिल्या परकाळे : कोल्हापूर
सोशल मीडिया, टी. व्ही. मालिका, चित्रपट, कार्टुन्स माध्यमातून हिंदी भाषा सहजपणे आणि सलगपणे कानावर पडते. परिणामी हिंदी समजणे आणि तोंडवणणी पडणे यातून ती भाषा बोलणे अवघड राहिलेले नाही. अलीकडे हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषेतील काही शब्दांच्या एकत्रिकरणातून नवीन वॉटस्ऍपवरील ‘हिंग्लीश’ भाषा उदयास आली आहे. व्हॉटसऍप, व्टिटर, इन्स्टाग्राम, ब्लॉग, फेसबुक, युटय़ुबवर हिंदीचा वापरही वाढल्याचे चित्र आहे. या अर्थाने सोशल मीडिया हे माध्यम †िहंदी भाषेच्या संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरतेय. यातून हिंदी चौकटीबाहेर जाऊन बोलली, वाचली आणि आत्मसात केली जात आहे. हेच हिंदी भाषा संवर्धनाचे नवे परिमाण म्हटले तर वावगे ठरणार नाही.
कायद्याने राष्ट्रभाषा नसून राजभाषा म्हणून हिंदी भाषेचा गौरव केला आहे. हिंदीबरोबर अन्य भारतीय भाषांना राजभाषा म्हणून स्विकारले असल्याने 14 सप्टेंबर हा हिंदीसह अन्य 22 भाषांचा गौरव दिन आहे. यानिमित्ताने हिंदीचा वाढलेला वापरात सोशल मीडियाचे स्थान महत्वाचे असल्याचे एका निरीक्षणातून पुढे आले आहे. मराठी प्रमाणेच हिंदी ही देवनागरी अक्षरांची भाषा आहे. मराठीशी साध्यर्म असणारी ही भाषा असल्याने मराठी भाषिकांनाही ती आपलीशी वाटते. परिणामी दक्षिणेत स्थानिक भाषेच्या जोडीला इंग्रजीचे प्राबल्य दिसते. उत्तर भारतात बहुतांश हिंदी हीच बोलीभाषा दिसते. याउलट मराठीशी साध्यर्म असल्याने हिंदी भाषा महाराष्ट्रात सहज बोलली जाते. समजते हे वैशिष्ट आहे.
सोशल मीडियावरील हिंदी भाषा कोणालाही सहज समजेल, अशी आहे. सातत्याने कार्टुन, शॉटस् पाहून काही लहान मुलांना तर मराठीपेक्षा हिंदी भाषा सोपी आणि आपलीशी वाटते. काही मुल दररोजच्या व्यवहारात सातत्याने हिंदी भाषेचा वापर करताना दिसतात. अगदी अडाणी माणसालाही हिंदी चित्रपट, मालिका पाहून हिंदी भाषा कळते, पण बोलता येत नाही, अशी अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. हिंदी भाषेवर प्रभुत्व असलेल्या व्यक्तीला देश-विदेशात रोजगाराच्या अनेक संधी आहेत. पुणे, मुंबईसारख्या शहरात नोकरीसाठी स्थायिक झालेल्या लोकांवर हिंदी भाषेचा इतका प्रभाव आहे, की हिंदी भाषा त्यांच्या दैनंदिन व्यवहाराची भाषा झाल्याचे दिसते.
भाषा संवादाचे साधन असल्याने कोणतीही भाषा मानसांना जोडणारी असून, तज्ञांनी शुध्द भाषेचा आग्रह धरू नये. भाषा कोणाचीही वाट न पाहता ती प्रवाहाबरोबर बदलत राहते. भाषा संप्रेषणासाठी इतर भाषेतील शब्द स्वतःमध्ये सामावून घेत स्वतःची प्रगती करीत राहते. त्यामुळे शब्दाच्या प्रतिशब्दाचा आग्रह न धरता इतर भाषेचा प्रचलित शब्द आहे तसा स्वीकारला पाहिजे. हिंदी, मराठी, इंग्रजी एकमेकांना सामावून घेत पुढे जाताना दिसतेय. या हिंग्लीश संक्षीप्त भाषेमुळे कमी वेळेत अधिक व्यक्त होता येते ही सर्वच भाषांची मोठी ताकद म्हणावी लागेल. सोशल मीडियाच्या माध्यमातून युवा पिढीने भाषेची संक्षिप्त रुप स्वीकारले आहेत, त्यातून अर्थबोध होतो त्यामुळे भाषाशास्त्राप्रमाणे बदल झाले पाहिजेत, असा आग्रह भाषातज्ञ धरत नाहीत.
हिंदी जनभाषा म्हणून प्रगत
हिंदी भाषेला राष्ट्रीय भाषा नव्हे तर राजभाषा म्हणून कायद्याने स्वीकारले आहे, परिणामी हिंदी कार्यालयीन बोली भाषा झाली असली तरी कागदपत्रातील भाषा झालेली नाही. संसदेत हिंदी भाषेत चर्चा होते पण त्याचा इतिवृतांत अहवाल इंग्रजी भाषेत तयार केला जातो. युनोने हिंदी भाषेक कामकाज करण्यास मान्यता देऊन ते स्वीकारले आहे. त्यामुळे हिंदी भाषा इंग्रजीला मागे सारत जगातील भाषेत नंबर वनची दावेदार झाली असूनही राजकीय क्षेत्राात हिंदी भाषेची उपेक्षा झाली आहे. परंतू जनभाषा म्हणून हिंदीची प्रगती झाली आहे.
हिंदी भाषेत रोजगाराच्या संधी
हिंदी भाषेवर प्रभुत्व असणाऱ्यांना अनेक क्षेत्रात रोजगार सहज मिळतात. इंग्रजी, मराठीसह अन्य भाषांचा हिंदीत अनुवाद करणे. अनुवाद, लिखान, जाहिरात, निवेदन, संपादन, डॉक्युमेंट्री, पटकथा, संवाद लिखान, खेळाची कॉमेंट्री आदी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. सोशल मीडियासह सर्वच क्षेत्रात हिंदी भाषा आपल अस्तित्व वाढवत आहे.
हिंदी भाषा समृध्दीसाठी चित्रपट महत्वाचे साधन
हिंदी भाषा समृध्दीसाठी ज्ञानपीठ विजेत्यांबरोबरीने हिंदी गायक, अभिनेत्री, अभिनेत्यांचे मोठे योगदान आहे. मालिका, चित्रपट हिंदी भाषा संवाद साधण्याचे महत्वाचे साधन आहे. अनेकदा हिंदी चित्रपट, मालिकांनी इंग्रजी, मराठी भाषेतील प्रचलित शब्द स्वीकारून आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. याला भाषा तज्ञांनीही मान्यता दिली आहे.
डॉ. अर्जुन चव्हाण (माजी हिंदी विभागप्रमुख, शिवाजी विद्यापीठ)
हिंदी-मराठी भाई-भाई
मराठी आणि हिंदी भाषेत साध्यर्म असल्याने जास्तीत जास्त हिंदी भाषिक अधिकारी महाराष्ट्रात येतात. हिंदी आणि मराठी भाषेतील अक्षरे देवणागरीतील असल्याने दोन्ही भाषा समजण्यास, बोलण्यास सोप्या आहेत. परिणामी हिंदी भाषिक महाराष्ट्रात आल्यानंतर काही महिन्यातच उत्कृष्ट मराठी भाषा बोलतात. त्यामुळे हिंदी-मराठी भाई-भाई असेही म्हंटले जाते.