बेंगळूर :
गुरुवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सोमवारपासून सुरू होणाऱ्या सामाजिक, शैक्षणिक सर्वेक्षणाला मंत्र्यांकडूनच विरोध झाला होता. मात्र, शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी सर्वेक्षण पुढे ढकलणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यापाठोपाठ राज्य मागासवर्ग आयोगाच्या सचिवांनी अधिकृत आदेशपत्रक जारी केले असून 22 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीत राज्यभरात सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण हाती घेण्याचे निर्देश दिले आहेत.









