सावंतवाडी : प्रतिनिधी
सामाजिक कार्यकर्त्या सौ. परिणीती पराग वर्तक (४७) यांचे अल्प आजाराने गुरुवारी निधन झाले. गेले काही दिवस त्या आजारी होत्या. गुरुवारी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना आयुर्वेद रुग्णालयात दाखल केले होते. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्या सुरुवातीला शिवसेना आणि त्यानंतर भाजपच्यामाध्यमातून कार्यरत होत्या. त्यांच्या पश्च्यात पती, दोन मुलगे, एक मुलगी,आई, भाऊ असा मोठा परिवार आहे. दूध व्यावसायिक पराग वर्तक यांच्या त्या पत्नी तर हॉटेल जय भवानीचे मालक प्रसाद राऊळ यांच्या त्या भगिनी होत.









