चेन्नई
तामिळनाडूच्या पुदुकोट्टई जिल्ह्यात अवैध खाणींचा पर्दाफाश करणारे सामाजिका कार्यकर्ते जगबर अली यांची हत्या करण्यात आली आहे. या हत्येप्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली आहे. तर हत्येपूर्वी अली यांनी थिरुमायम तालुक्यातील अवैध खाणींवरून आरआर ग्रूपवर गंभीर आरोप केले होते. तसेच त्यांनी हजारो कोटी रुपयांचा खाणघोटाळा उघडकीस आणला होता.









