सामाजिक बांधिलकीचे निवेदन
सावंतवाडी वेंगुर्ला बस स्टॅन्ड समोरील आंबोलीकडे वळणाऱ्या रस्त्यावर दोन दिवसापूर्वी रात्री 9:15 च्या दरम्याने एक महिलेचा तोल जाऊन ती मुलीसहित रस्त्याच्या बाजूचे उघड्या गटारामध्ये पडली. त्यामुळे तिच्या हाताला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच लहान मुलीलाही दुखापत झाली. त्यावेळी सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलला नेऊन त्याच्यावर उपचार केले. कधी कधी वृद्ध व लहान शाळकरी मुले देखील सदरच्या उघड्या गटारात पडत आहेत. चार दिवसांपुर्वी सदर गटारात पडून वृद्ध व्यक्ती जखमी झाली होती. तिला तेथील जवळच्या वर्तमानपत्र विक्रेत्याने बाहेर काढून त्यांचेवर उपचार केलेले आहेत.
त्या अनुषंगाने मा.कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, सावंतवाडी यांनी दिलेल्या आश्वासनास आज अडीच महिने उलटूनही गटारे बंद केलेली नाहीत. पर्यंत जर आपणाकडून सदरची गटारे बंद करणेसाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही तर सदरची गटारे बंद करावीत अशी मागणी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून करण्यात आली आहे . त्यामुळे दि.30/05/2023 पर्यंत बांधकाम खात्याकडून सदरची गटारे बंद करणेसाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही तर लोकवर्गणीतून ती सामाजिक बांधिलकी टीमच्या माध्यमातून दुरुस्त करण्यात येतील असे सांगण्यात आले .









