ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मी गद्दार झालो, असा अनेकांकडून आरोप होतो. होय, मी झालो गद्दार. एक मराठा चेहरा शिवसेनेमधून बाहेर जात होता आणि त्याला मुख्यमंत्री करण्यासाठी मी गद्दार झालो, अशी कबुली गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना दिली.
जळगावात विविध विकासकामांचे भूमिपूजन गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी बोलताना ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्यासारखा मराठा नेता आम्हाला शिवसेनेबाहेर जाऊ द्यायचा नव्हता. त्यांना आम्हाला मुख्यमंत्री करायचं होतं. त्यामुळे मी गद्दारी केली. मी गद्दारी केली म्हणून अनेक जण टीका करतात. पण केवळ विरोधाला विरोध करायचा आणि मतदारसंघात काही काम करायचं नाही. बिलखेडेत साधी एक मुतारी हे लोक बांधू शकले नाहीत आणि भाषणं ठोकतात, असा टोलाही पाटील यांनी विरोधकांना लगावला.
शरद पवार म्हणतात एकनाथ शिंदे कोण आहेत? असे म्हणून पवार कोणत्याही गोष्टीत जातीवाद करत असतील, तर होय. मी एकनाथ शिंदे यांच्यासाठी त्याग केला, असेही पाटील म्हणाले.
अधिक वाचा : लोकसभेसोबत विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात








