वृत्तसंस्था/शेफिल्ड (इंग्लंड)
इंग्लंडचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्नुकरपटू मार्क किंग मॅच फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळल्याने त्याच्यावर 5 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. गेल्या वर्षी झालेल्या वेल्स खुल्या स्नुकर स्पर्धेतील एका सामन्यात मार्क किंगकडून हा गुन्हा झाला होता. 50 वर्षीय मार्क किंगने 2003 साली स्नुकरपटूंच्या मानांकन यादीत 11 वे स्थान मिळविले होते. मार्क किंगने सामन्याचा निकाल निश्चित करण्यासाठी अंतर्गत माहिती पुरविल्याचे चौकशीअंती सिद्ध झाले होते. गेल्या वर्षी चीनचे स्नुकरपटू लियांग वेनबो आणि ली हँग यांच्यावर अजीवन बंदी घालण्यात आली होती. मार्क किंगला 86 हजार डॉलर्सचा दंड आणि 5 वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली आहे.









