वृत्तसंस्था/टोरँटो
डब्ल्युटीए आणि एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या नॅशनल बँक खुल्या महिला आणि पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत अमेरिकेची टॉपसिडेड गॉफला 14 व्या मानांकित डायना स्नेडरकडून पराभवाचा धक्का मिळाला.
महिला एकेरीच्या सामन्यात डायना स्नेडरने गॉफचा 6-4, 6-1 असा पराभव करत पुढीलफेरी गाठली. आता स्नेडरचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना सॅमसोनोव्हाशी होणार आहे. सॅमसोनोव्हाने मर्टन्सचा 6-2, 6-4, साबालेंकाने बोल्टरचा 6-3, 6-3, विद्यमान विजेती पेगुलाने व्रुगेरचा 6-2, 6-4, नेव्हारोने कोस्ट्यूकचा 7-5, 7-5 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले









