पर्ये : पर्ये-सत्तरी येथील श्री भूमिका प्राथमिक विद्यालयाचा बक्षीस वितरण समारंभ व स्नेहसंमेलन श्री भूमिका उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात नुकताच झाला. यावेळी विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविधरंगी सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केले. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रतापसिंह राणे, विशेष अतिथी म्हणून हायस्कुलच्या अध्यक्ष विजयादेवी राणे, मुख्याध्यापक गोविंद वळवईकर, प्राचार्य यशवंत सावंत, उच्च माध्यमिक विद्यालयाचे व्यवस्थापक शिवाजीराव राणे, हायस्कुलचे व्यवस्थापक शंकर च्यारी, प्राथमिक विद्यालयाचे व्यवस्थापक लक्ष्मण च्यारी, हायस्कुलचे मुख्याध्यापक दिवाकर पोसनाईक, संस्थेचे सचिव कुष्ठा राणे, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष यशवंत नाईक उपस्थित होते.
मुख्याध्यापक गोविंद वळवईकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गणेशनृत्य सादर केले. विद्यार्थ्यांनी नेहमीच खेळ, कला, कौशल्य व शिक्षण यात मन लावून सहभागी झाल्यास आपल्या आयुष्यात योग्य उद्दिष्ठ साध्य करू शकतो. शिक्षकांनी व पालकांनी चांगले प्रोत्साहन देऊन त्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यास हातभार लावावा, असे प्रमुख पाहुणे प्रतापसिंह राणे म्हणाले. चांगले नागरिक होण्यासाठी मुलांनी लहान वयातच शिस्त आणि चांगले संस्कार आत्मसात करावेत, असे विजयादेवी राणे म्हणाल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काव्या सावर्डेकर, पल्लवी माईणकर, हर्षा सायनेकर व सुवर्णा वायंगणकर यांनी केले तर सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तनुजा देसाई, सिया म्हाळशेकर, आर्तिका राणे, अथर्व सावंत व गौरव नाईक यांनी केले. शेवटी निकीता राणे यांनी आभार मानले.









