साप सर्वात विषारी प्राण्यांपैकी एक आहे, परंतु जगात एक असा साप आहे, ज्याची किंमत लाखो-कोट्यावधी रुपयांमध्ये आहे. या एका सापाच्या किमतीत दिल्ली-मुंबईसारख्या शहरात स्वत:चे घर खरेदी करता येणार आहे. जगातील सर्वात महागड्या सापाचे नाव ग्रीन ट्री पाइथन आहे. याचे सर्वात मोठे वैशिष्ट्या याचा रंग असून तो ग्रीन शेड्सचा आहे. हा साप अत्यंत सुंदर दिसतो.

हा साप सुमारे 2 मीटर लांबीचा असतो. ग्रीन ट्री पाइथनचे वजन समारे दीड किलो किंवा दोन किलोपर्यंत असते. फीमेल ग्रीन ट्री पाइथन अधिक लांब अन् वजनी असतो. सापाची ही प्रजाती अत्यंत दुर्मिळ मानली जाते. इंडोनेशियातील बेट, न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलियात हा साप दिसून येतो.
ग्रीन ट्री पाइथनची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 3 कोटी आहे. याच्या सुंदरतेमुळे याला मोठी मागणी आहे. ग्रीन टी पाइथनचा हिरवा रंग, नाजूक पांढरा पॅटर्न आणि एका विशिष्ट आकाराचे डोके याच्या आकर्षणात भर घालत असतात. किड्यांना फस्त करून हा साप स्वत:चे पोट भरत असतो. सापांची ही विशेष प्रजाती काही निवडक देशांमध्ये झाडांवर आढळून येतो. एक निळ्या रंगाचा पाइथन साप देखील असतो, जो अत्यंत दुर्मित मानला जातो.
ग्रीन ट्री पाइथन सर्वात महाग तसेच जगातील सवांत सुंदर साप शील्डटेल आहे. जंगलांमध्ये याचे वर्तन कशाप्रकारे असते याचे अध्ययन अद्याप करण्यात आलेले नाही.









